पुन्हा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी

0

लोकशाही न्युज नेटवर्क

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता पुन्हा एकदा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. हिंडेनबर्ग अहवालानंतर, अदानींच्या संपत्तीत $ 36 अब्जची घट झाल्याने गौतम अदानी 11 व्या क्रमांकावर घसरले होते.
सलग तीन दिवस घसरणीनंतर मंगळवारपासून गोतम अदानी यांचे शेअर्स पुन्हा एकदा चढायला लागले आहेत. समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये तेजी दिसून आली. यामुळेच ते पुन्हा एकदा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मंगळवारी गौतम अदानी यांच्या संपत्तीत $99.6 दशलक्षची वाढ झाली, त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती $84.5 अब्ज झाली.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या क्रमांकावर आहे. ज्यांची एकूण संपत्ती 191 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एलन मस्क आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 164 अब्ज डॉलर्स आहे. तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत, ज्यांची संपत्ती 126 अब्ज डॉलर आहे. बिल जेंट्स या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 112 अब्ज डॉलर आहे. वॉरन बफे पाचव्या क्रमांकावर आहेत, ज्यांची संपत्ती $109 अब्ज असल्याचे सांगितले जाते.

लॅरी एलिसन 101 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे. सातव्या क्रमांकावर लॅरी पेज आहे, ज्यांची एकूण संपत्ती 91.5 अब्ज डॉलर आहे. स्टीव्ह बाल्मर 88.6 अब्ज डॉलरसह आठव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी सर्जी ब्रिन 87.8 अब्ज डॉलरसह नवव्या क्रमांकावर आहेत. तर गौतम अदानी यांचे नाव 10 व्या क्रमांकावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.