राज्यात विविध मागण्यांसाठी माथाडी कामगार संपावर !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
माथाडी कामगारांनी आज राज्यव्यापी संप पुकारला आहे.या संपामुळे नवी मुंबईतील पाचही मार्केट बंद आहेत. पहाटे सुरू होणाऱ्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्येही कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे भाजीपाला तसेच कडधान्याचा आज तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून भाजीपाला आणि कडधान्य आज महागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी करण्यात काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील ( यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलनकरण्यात आले आहे. माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवण्यासाठी तातडीने लक्ष दिले जावे, अन्यथा माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेणे भाग पडेल, असा इशाराही माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.