थोरगव्हाण येथील तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी

0

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील वाघोदा गावाजवळ मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या अपघातात एक तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी तरूणास उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे.

आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी  ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान  कल्पेश आनंद पाटील (वय २२, रा. थोरगव्हाण ता. यावल) हा आपल्या कडील एमएच १९ डी टी ७५२० या पल्सरने साकळीहुन जळगाव जात असतांना यावल किनगाव मार्गावरील वाघोदा गावा जवळ जी जे२३, डब्ल्यु ७६३५या अवजड वाहनाचा अपघात होवुन यात परेश पाटील हा गंभीर जखमी झाला आहे.

घटना स्थळावरून साकळी आरोग्य केंद्राकडून १०८ क्रमांकाच्या वाहनातून जखमी तरूणास तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अघिकारी डॉ. जिशान खान व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी प्रथमपोचार करून जखमी तरुणाची प्रकृती बघता त्यास पुढील उपचारासाठी जळगाव येथील वैद्यकीय विद्यालयात पाठविण्यात आले आहे. या अपघातातील दुचाकी वाहन व ट्रकचालक अरविंद यादव यास ट्रकसहीत पोलीस ठाण्यात जमा केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.