बापरे.. दोन विमानांची आकाशात धडक, थरकाप उडवणारा व्हिडीओ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दोन विमानांच्या अपघाताचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जर्मनीमध्ये दोन विमानांची धडक झाल्याची घटना समोर आली आहे. उंच आकाशात उडणाऱ्या या विमानांच्या अपघाताचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. दरम्यान थरकाप उडवणारा हा संपूर्ण अपघाताचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

https://twitter.com/green_grap/status/1573775404934090753?s=20&t=g6GdcaFi0vIpmrGnMOVhKA

ही विमान दुर्घटना शनिवारी संध्याकाळी 6 वाजता घडल्याची माहिती मिळत आहे. आकाशात साहसी प्रात्यक्षिके करताना हा अपघात झाल्याचं दिसून येत आहे. दोन्ही विमान एकामागे एक उड्डाण करताना दिसत आहेत. अचानक एक विमान खाली येतं आणि पुन्हा वर जातं आणि मागील विमानाला धडक देतं. धडक झाल्यानंतर दोन्ही विमानं एकमेकांमध्ये अडकली.

दरम्यान या अपघातात दोन्ही विमानाच्या वैमानिकांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. वेगाने दोन्ही विमानं जमिनीवर पडली. कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृष्यानुसार दोन्ही विमानं दूर झाडांमागे पडली. त्यानंतर काही सेकंदात हळूहळू धूर वर आकाशात दिसू लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वैमानिकांचा मृत्यू झाला असून दोन्ही वैमानिक मिरर फ्लाइटसाठी प्रशिक्षण घेत होते. अशावेळी विमाने एकमेकांना समांतर उडतात. या दोन्ही वैमानिकांनी 2019 मध्ये व्हिंटेज एरोबॅटिक्समध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपदही पटकावले होते.

‘द सन’ या ब्रिटीश वृत्तपत्राशी बोलताना विमान वाहतूक तज्ज्ञ अँड्रियास स्पेथ यांनी सांगितले की, दोन्ही वैमानिक त्यांच्या विमानासोबत एरोबॅटिक्सचे एकत्र प्रशिक्षण घेत होते, असे दिसते. दोन्ही विमाने अडकली आणि नंतर ते एकत्र क्रॅश झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.