दुचाकी स्लिप झाल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील कामे आटोपून म्हसावद मार्गे मामा नगराज भरत पाटील व भाचा पंकज दुचाकीवरून घरी परत येत असताना उमरदे खदानी जवळ वळणावर समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक हुलकावणी दिल्याने दुचाकीचा तोल जाऊन स्लिप झाली व घसरत जाऊन रस्त्याच्या बाजूला पडली.

त्यात दुचाकीवर मागे बसलेला भाचा पंकज (वय २२) हा गंभीर जखमी झाला. त्याला एरंडोल येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना १५ मे २०२२ रोजी सकाळी १०.५० वाजेच्या सुमारास घडली.

पंकज हा एरंडोल येथे बजाज फायनान्स कंपनीत कामाला होता. त्याला जळगाव येथे खाजगी काम असल्याने एम एच १९ डीएक्स ४८६७ क्रमांकाच्या दुचाकीने जळगावला गेले. ते मराठखेडा येथे घराकडे परत येत असतांना दुचाकीला अपघात झाला. नगराज पाटील हे दुचाकी चालवत होते व पंकज मागे बसला होता. या घटनेबाबत एरंडोल पो.स्टे. ला नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.