अंदमान समुद्रात धडकणार मान्सून; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर हंगामातील पहिला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाही मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी वेळेच्या चार दिवस आधी पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, नैऋत्य मान्सून 15 मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय आखातात पोहोचण्याची शक्यता आहे.

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, विस्तारित अंदाज केरळमध्ये वेळेपूर्वी मान्सून सुरू होण्याचे आणि उत्तरेकडे सरकण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या देशातील बहुतांश भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचं (नैऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगलाच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर केरळमध्ये देखील अतिवृष्टी चालूच आहे. आसाम, मेघालय व पश्चिम बंगालमध्ये देखील चांगलाच पाऊस होत आहे. परंतु या उलट उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायमच टिकून आहे. उत्तर भारतातील कमाल तापमानाचा पारा 45 ते 49 अंश सेल्सिअसवर गेला आहे. तर गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना अद्यापही उष्णतेपासून दिलासा मिळालेला नाही.

अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचवेळी राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाच्या सरी बरसणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी राज्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांसोबत परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 9 जिल्ह्यांमध्ये देखील 16 ते 19 मे पर्यंत ते चार म्हणजेच 4 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या 4 जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.