सिहोरहून येताना अपघात, खान्देशातील 2 महिलांचा मृत्यू

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल 20 लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. यावेळी एका महिलेचा मृत्यू झाला तर खान्देशातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत नाही तोच आज पहाटेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील एका गावातील दोन भाविक महिलेचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला भाविक सिहोर येथून रात्री 12 वा. निघालेले असतांना असतांना इंदौर हायवेवर जुलवानिया गावाजवळ पहाटे 5 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कमलबाई आत्माराम बिरारी, शोभाबाई लुकडू बिरारी या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या अपघातात अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला शोभाबाई लुकडू पाटील (वय 52), कमलबाई आत्माराम पाटील (वय 55) यांचा सिहोर हुन घरी परत येत असताना मध्यप्रदेशात जुलवानिया गावाजवळ MH 19 DV 6783 इको गाडीचा अपघातात दोघ महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.