पाचोरा तालुक्यात २ मंडळे, १३ सजामधे झाली वाढ

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

राज्यात महसूल व वन विभाग यांनी तलाठी सजांची (सांझा) ची नवनिर्मिती व पुनर्रचना केली असून यात पुर्वी पाचोरा, नगरसेवक, पिंपळगाव (हरेश्र्वर), वरखेडी, नांद्रा, कुऱ्हाड खु” व गाळण बु” असे सात मंडळे असतांना त्यात शिंदाड व लोहटार या दोन मंडळाची वाढ होऊ ९ मंडळे झाले आहेत तर पुर्वी ४३ सजा (सांझा) असतांना त्यात वाढ करण्यात येवून त्या ४६ झाल्या आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांना सजा जवळ झाल्याने आनंदाचे तर काहींना सजा आपल्या गावापासून दूर गेल्याने त्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे.

पाचोरा तालुक्यात नवनिर्मित व पुनर्रचनेनंतर १) पाचोरा एक पुर्व हिवरा नदी, पश्चिम रेल्वे लाईन (भुयारी मार्गा पर्यंत) व पुढे पुनगाव व अंतुर्ली बु” शिव, उत्तर भाग पाचोरा भडगाव रोड (भुयारी मार्गा पर्यंत) व पुढे वडगांव टेकची शिव, दक्षिण- जारगावची शिव व हिवरा नदी, पाचोरा २) पुर्व – भुयारी मार्गा पासून रेल्वे लाईन ते वडगांव टेकची शिव, पश्चिम – मौजे पुनगाव, मांडकी व ओझरची शिव, उत्तर – मौजे अंतुर्ली खु” शीव, दक्षिण – पाचोरा भडगाव रोड, पाचोरा ३) कृष्णापूरी – पुर्व गोरागखेडा, आर्वै, पश्चिम – हिवरा नदी, उत्तर – वडगाव टेक, दक्षिण – सारोळा, ४) पुनगाव – पुनगाव, मांडकी ५) परधाडे – परधाडे, बहुळेश्वर, वडगाव टेक, वडगांव असेरी, वडगांव बु” प्र. पा., ६) अंतुर्ली बु” प्र. पा. – अंतुर्ली बुद्रुक प्र. पा.,अंतुर्ली खु” प्र. लो.,७)बांबरुड खु” प्र. पा. – बांबरुड खु” प्र.पा. ८) सारोळा बुद्रुक – सारोळा बु” सारोळा खु” व चिंचखेडा खु” ९)जारगाव – जारगांव १०) दुसखेडा – दुसखेडा वडगांव खु” प्र.पा., हडसन ११) भातखंडे खु” – भातखंडे खु”, अंतुर्ली खु” प्र.पा., ओझर १२) खडकदेवळा खु” – खडकदेवळा खु”, डोंगरगांव, वाघुलखेडा १३) गाळण बु” – गाळण बु”, गाळण खु”, हनुमान वाडी, विष्णू नगर,१४) मोंढाळा – मोंढाळा, निंभोरी बु”, निंभोरी खु”, वाणेगाव १५) तारखेडा खु” -तारखेडा खु”, खडकदेवळा बु” १७) लोहटार – लोहटार १८) बाळद बु” – बाळद बु”, नाचणखेडा, १९) नगरदेवळा – १ – पुर्व – चुंचाळे, पश्चिम – नगरदेवळा २, उत्तर – रेल्वे स्टेशन, दक्षिण – निपाणे, २०) नगरदेवळा २ – पुर्व – नगरदेवळा १, पश्चिम – आखतवाडे उत्तर – संगमेश्वर, दक्षिण – निपाणे, संगमेश्वर २१) घुसर्डी बु” -घुसर्डी बु”, टाकळी बु”, होळ, सांगवी प्र. भ., वडगांव खु” प्र.भ.,२२) आखतवाडे – आखतवडे, मोहलाई, २३) नेरी – नेरी, खाजोळा, २४) वडगांव मुलाने – वडगाव मुलाने, भडाळी, दिघी,२५) निपाणे- निपाणे, बदरखे, २६) पिंप्री बु” प्र. भ. -पिंप्री बु” प्र. भ., सार्वे बु” प्र. भ., सार्वे खुर्द प्र. भ., भोरटेक खु”, २७) पिंपळगाव खु” – पिंपळगाव खु”, चुंचाळे, नगरदेवळा सिम २८) नांद्रा – नांद्रा २९) पहाण -पहाण, आसनखेडा बु”, आसनखेडा खु”३०) लासगाव – लासगाव ३१) बांबरुड प्र.बो. – बांबरुड प्र.बो.,३२) कुरंगी – कुरंगी, माहेजी ३३) दहिगांव – दहिगांव, डोकलखेडा, वरसाडे प्र.बो. ३४) सामनेर -सामनेर ३५) साजगाव -साजगाव, मोहाडी,बिल्दी ३६) गोराडखेडा बुद्रुक – गोराडखेडा बुद्रुक, खुर्द ३७) भोकरी – भोकरी, सार्वे, जामने ३८)वरखेडी बुद्रुक -वरखेडी बुद्रुक खुर्द व लासुरे ३९) लोहारी बुद्रुक -लोहारी बुद्रुक खुर्द व आर्वे ४०) सावखेडा बु” – सावखेडा बु” सावखेडा खु” व डांभुर्णी ४१) खेडगाव (नंदिचे) – खेडगाव (नंदीचे) वेरुळी बु”, खेडगाव (नंदीचे) खु”, ४२) वडगांव आंबे – वडगांव आंबे, वडगांव आंबे बु”, वडगांव आंबे खु”, वडगांव जोगे व कोकडी ४३) कुऱ्हाड बु” – कुऱ्हाड बु”, सांगवी प्र.लो., नाईकनगर ४४) कुऱ्हाड खु” – कुऱ्हाड खु” ४५),म्हसास- म्हसास, रामेश्वर, लाख ४६) कासमपूरा – कासमपूरा, शाहपुरा ४७)लोहारा – लोहारा ४८) कळमसरा – कळमसरा ४९) पिंप्री बुद्रुक प्रपा -पिंप्री बु” प्र.पा., अटलगव्हाण, कोल्हे ५०) पिंपळगाव बुद्रुक १ -पुर्व-जरंडी, पश्चिम -शिंदाड उत्तर – पिंप्री बुद्रुक प्रपा, दक्षिण -पिंपळगाव बुद्रुक २, (५१) पिंपळगाव बुद्रुक २-पुर्व-जरंडी, पश्चिम -शिंदाड, उत्तर – पिंपळगाव बुद्रुक एक, दक्षिण – वरसाडे प्रपा ५२)भोजे – भोजे,चिंचपुरे,राजुरी बुद्रुक, राजुरी खुर्द, ५३) वाडी – वाडी, शेवाळे ५४) सातगाव डोंगरी – सातगांव डोंगरी, पिंप्री खुर्द प्र.पा., सार्वे बु” प्र.पा.,५५) वडगांव कडे – वडगावकडे, गव्हुले व वरसाडे प्रपा,५६) शिंदाड-शिंदाड व जवखेडी याप्रमाणे ५६ सजा झाल्या आहेत.

२० तलाठ्यांची संख्या अपूर्ण
पाचोरा तालुक्यात यापूर्वी ४३ सजा असतांना त्यासाठी ३६ तलाठी कार्यरत होते. आता मात्र ही संख्या १३ ने वाढून ५६ वर गेली असतांना तलाठी केवळ ३६ आहेत. २० तलाठी अपूर्ण असल्याने एका तलाठ्याकडे तीन ते चार गावे असल्याने त्यांना शेतकऱ्यांना सेवा देणे अवघड होणार आहे, शासनाने लवकरात लवकर तलाठी भरती करावी अशी मागणी करण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.