शिवपुराण कथेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात !

0

विवाहिता जागीच ठार , दोन जण जखमी ‘;कोथळी जवळील घटना

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
बऱ्हाणपूर येथे शिवपुराण कथेसाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना भरधाव वेगाने आलेल्या अपे रिक्षा ने धडक दिली. यात एका तरुण विवाहितेचा जागेवरच मृत्यू तसेच इतर दोन जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील प्रणव श्रीराम महाजन वय २२ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, किशोर श्रीराम महाजन हे त्यांच्या ॲपे रिक्षा क्र.(MH19 AX 3168 ) या वाहनाने चिंचोलहुन बुऱ्हाणपूर येथे सुरू असलेल्या शिवपुराण कथा ऐकण्यासाठी जात होते त्यात सीमा अविनाश पाटील व आशाबाई मनोहर महाजन हे बसलेले होते.

सदरील रिक्षा ही कोथळी उड्डाण पुल बायपास जवळ आले असता त्या ठिकाणी ॲपे रिक्षांची वाट पाहत असलेले प्रवाशी दिपाली उमाकांत तायडे वय २८ वर्ष व वस्तलाबाई भागवत पाटील वय ५० वर्षे दोघे रा. चिंचोल उभ्या होत्या.  परंतु भरधाव रिक्षाने नियंत्रण सुटून त्यांना धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटून झालेल्या अपघातात सीमा अविनाश पाटील वय ३५ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर  प्रवाशी जखमी झाले. याबाबत फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.