काका वारले सांगून अल्पवयीन मुलीला पळविले

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शिक्षणासाठी पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज येथे बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आली होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला “तुझे काका वारले आहे, तू माझ्यासोबत चल” असे सांगून पळवून नेले. हा प्रकार घडल्यानंतर दुपारपर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिच्या मैत्रिणी व इतर ठिकाणी शोध घेतला. परंतु तिची कुठलीही माहिती न मिळाल्याने अखेर त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.