अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
अत्याचार प्रकरणी भडगाव पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी विजय दशरथ पाटील (25, रा.यशवंत नगर, भडगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी बसस्थानक भागातून अटक केली. आरोपीला तपासकामी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.