भरधाव कारच्या धडकेत वृद्ध जखमी

0

जळगाव । लोकशाही न्यूज नेटवर्क

भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दिलीप ललवाणी (वय-६५) रा. आदर्श नगर, हे गुरूवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ते शतपावली करण्यासाठी काव्यरत्नावली चौकात पायी जात असताना शहरातील आरटीओ कार्यालयाजवळून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच १९ सीयू ७४९२) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दिलीप ललवाणी हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर कारचालक हा कार घेवून फरार झाला. . स्थानिक नागरीकांनी जखमी ललवाणी यांना रुग्णालयात दाखल केले. जखमी दिलीप ललवाणी यांची पत्नी कुसूमबाई ललवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात कार क्रमांक (एमएच १९ सीयू ७४९२) वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार संजय चौधरी पुढील तपासकरीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.