मुक्ताईनगर तालुक्यात बिबट्याचा संचार ; शेतकरी भयभीत

0

मुक्ताईनगर । लोकशाही न्यूज नेटवर्क

वनविभागाच्या कॅमेरामध्ये बिबट्याचा अधिवास असल्याचे लक्षात आल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे नांदवेल व चिंचखेडा बु.येथील शेतकरी धास्तावले असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

महिनाभरापुर्वी चिंचखेडा येथील पशुधनावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याचीही घटना घडली होती.तसेच अनेकांनी बिबट्याला पहिले असून त्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. नांदवेल-चिंचखेडा बु शिवारातील पुर्णा नदी काठा जवळ लागून असलेल्या शेती-शिवारात बिबट्याचा अधिवास आहे. याबाबत सरपंच तथा वनसमिती अध्यक्ष प्रविण खिरोडकर,गजानन पाटील यांनी वनविभागाला याची माहिती दिल्याने वनविभागाकडुन शेतीरस्त्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.यामध्ये बिबट्याची छबी कॅमेऱ्यात कैद झाल्याने बिबट्याचे याठिकाणी असलेलं वास्तव्य अधोरेखित झाले आहे. त्यामुळे शेतातील कामांसाठी शेतमजूर अथवा शेतकरी धजावत नसल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.