मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात लहुजी शक्ती सेनेचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यांनी थेट दिल्ली गाठली. सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय राज्यमंत्री के. नारायण स्वामी यांची भेट घेऊन वर्षानुवर्षांपासून समाजाला उद्भवणाऱ्या मागण्यांसंदर्भात सखोल चर्चा करुन मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी प्रकाश कांबळे, अंबादास अल्हाट, सुभाष पगारे, समाधान बोराडे, रविंद्र खैरनार, सचिन कांबळे, फकिरा गायकवाड हे दिल्ली येथे उपस्थित होते.

अनुसुचीत जातीसाठी उपलब्ध आरक्षणाची अ, ब, क, ड वर्गीकरण करुन मातंग समाजाच्या १२ पोटजातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण प्रदान करण्यात यावा, जगविख्यात साहित्य सम्राट ‘डॉ.अण्णाभाऊ साठे’ यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात यावा, आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांना राष्ट्रिय महापुरुषांच्या यादी मध्ये नाव समाविष्ठ करण्यात यावा अनुसूचित जाती सवर्गातील दुर्लक्षीत घटकांसह मातंग समाजाला सामाजीक न्याय व विशेष संधी उपलब्ध करुन देण्यासाठी साहित्य सम्राट डॉ. अन्नाभाऊसाठे शिक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्था स्वतंत्रपणे तात्काळ सुरु करण्यात यावी. या मागण्या मातंग समाजाच्या १२ पोट जातींच्या समाजाच्या हितासाठी असुन या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात असे निवेदन सामाजिक न्याय व सक्षमीकरण केंद्रीय राज्यमंत्री के. नारायण स्वामी यांना लहुजी शक्ती सेनेतर्फे दिल्ली येथे देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.