Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, २ जखमी
    ताज्या बातम्या

    कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, २ जखमी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 7, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यातील दुर्घटनांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता आणखी एका अपघाताची भयानक बातमी समोर आली आहे. कर्जत-नेरळ मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. कर्जत किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार रेल्वे ट्रॅकवर थेट खाली कोसळली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालगाडीची कराल धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

    मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या दोघांवर सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार ही कर्जत येथून नेरळच्या दिशेने जात होती. त्यावेळी कारमध्ये पाच ते सहा प्रवासी होते. मात्र ही कार कर्जत ते नेरळच्या दरम्यान असलेल्या किरवली पुलावर आल्यावर कारचालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. आणि ही कार क्षणार्धात धाडकन ब्रिजवरून खाली असलेल्या पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर कोसळली. मात्र त्याच वेळी तेथून एक मालगाडी जात होती. त्या मालगाडीची कारला जोरात धडक बसली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला झाला, कारचेही मोठे नुकसान झाले.

    या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आजूबाजूच्या लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील दोन जखमींना तातडीने औपचारांसाठ एमजीएम रुग्नालयात दाखल करण्यात आले मात्र, या भीषण अपघातामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #maharashtra accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड

    November 6, 2026

    अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif