वरणगावच्या तरुणाचा दुचाकी घसरल्याने डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू

0

वरणगाव ;- दुचाकी घसरून डोक्याला दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावर घरी जात असतांना सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली . याप्रकरणी वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज अशोक नाथ वय ३३ रा. रामपेठ वरणगाव ता.भुसावळ असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मनोज नाथ हा वारणगावच्या रामपेठमध्ये कुटुंबियांसह राहत होता. मनोज हा सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी दुचाकीने वेल्हाळे येथून घरी जाण्यासाठी निघाला असता विल्हाळे ते वरणगाव रस्त्यावर त्याची दुचाकी अचानक रस्त्यावर घसरली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरील ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला खासगी वाहनाने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासाअंती मयत घोषीत केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी होती. या घटनेबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.