धक्कादायक; पोलीस शिपाईकडून महिला शिपाईशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईला पोलीस दलातील एका पोलीस शिपायाकडून महिला शिपाई सोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अँटॉप हिल पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी उत्तम (वय ३५) याच्या विरोधात कलम ३५४, ३५४(आय), ३५४(क), ५०९, ५०४, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई यांना आरोपी वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने महिलेला तिच्या पतीला बदनाम करण्याचे तसेच शिवीगाळ करून नोकरी घालवण्याची धमक दिली, असाही महिलेले तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलीस अधिक तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.