शास्त्र आणि तंत्रज्ञान कार्यक्रम राबवणे काळाची गरज -डॉ. अब्दुराहीम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
शैक्षणिक पातळीवर विद्याशाखेकरीता असा अभिनव शाश्वत व्यवसाय व्यवस्थापन,शास्त्र आणि तंत्रज्ञान असा कार्यक्रम राबवणे म्हणजे काळाची गरज आहे यातून नवनवीन संशोधन त्यातील कल्पकता जागरूकता निर्माण करणारी ठरेल असा विश्वास असोसा विद्यापीठ, इथिओपिया अध्यक्ष डॉ.केमाल अब्दुराहीम यांनी व्यक्त केला.

खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटी आणि असोसा विद्यापीठ (एएसयु) इथिओपिया करिता ऑन लाईन आंतरराष्ट्रीय विद्याशाखा विकास कार्यक्रमाचे तीन दिवसीय आयोजन नुकतेच करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.यात आंतरराष्ट्रीय विद्याशाखा विकास कार्यक्रमातून नाविन्यपूर्ण शोध आणि संशोधन शाश्वत व्यवसाय व्यवस्थापन,शास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावर खान्देश कॉलेज एज्यूकेशन सोसायटीच्या विविध शाखेतील प्राध्यापकानी मार्गदर्शन केले.

यात शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ.अशोक राणे,एपीजे अब्दुल कलाम कौशल्य विभागाचे प्रा.संजय पावडे,प्रा.निलेश जोशी,प्रा.कैलाश खडसे,डॉ.निशांत घुगे,डॉ.अंजली बोंदर ,डॉ.संत्रम्मा वर्गीस,डॉ.पराग नारखेडे,सी.ए.डॉ.श्वेता चोरडिया,डॉ.केतन नारखेडे, डॉ.व्हिक्टर सेफेहा(तंत्रज्ञान विद्यापीठ,बहरीन) व डॉ.नरेंद्र खत्री(मणिपाल)यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला इथिओपिया येथील संशोधक,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमात असोसा विद्यापीठ, इथिओपिया अध्यक्ष डॉ.केमाल अब्दुराहीम आणि डॉ.अब्दुल्मुहासीन हसेन यांनी केसीई सोसायटीचे शैक्षणिक संचालक डॉ. योगेश खडके यांचे आंतरराष्ट्रीय विद्याशाखा विकास कार्यक्रम आयोजनाबद्दल आभार मानले.प्राचार्य संजय भारंबे व डॉ.शिल्पा बेंडाळे यांचे विशेष सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.