राज्यपालांच्या वक्तव्यावर आम्ही असहमत – आशिष शेलार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सद्य परिस्थितीत चर्चेत असलेल्या मुंबई बद्दलच्या राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप असहमत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलारांनी दिली आहे. मुंबईमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबईत शुक्रवार २९ जुलै रोजी दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलतांना, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांविना मुंबईस आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.

राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजपाकडूनही नुकतीच प्रतिक्रिया दिली गेली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्वीट करत राज्यपाालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे रोखठोक मत व्यक्त केले आहे. ”राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसांच्या परिश्रमातून, घामातून आणि म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.