मिस्टर इंडिया बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचं निधन…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चार वेळा मिस्टर इंडिया विजेता राहिलेला मराठी मातीचं नाव जगभरात पोहचवणारा बॅाडीबिल्डर त्याच बरोबर चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आशिष साखरकर याचं निधन झालं आहे. आशिषनं देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत महाराष्ट्राच नाही तर देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. गेल्या काही दिवसांपासून आशिष एका आजाराशी झुंज देत होता. अखेर या आजारानंच आशिषचा जीव घेतला. या घटनेनंतर आशिषच्या चाहत्यांना मोठा धक्का पोहचला आहे.

मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक पुरस्कारावर आशिषनं आपलं नाव कोरलं आहे. अनेक बॉडीबिल्डर्सचे रोल मॉडल. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात आशिष साखरकर यांना बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील आयकॉन मानलं जातं. काही दिवसांपूर्वी आशिष साखरकर यांना आजारानं ग्रासलं होतं. याच आजारावर गेल्या काही दिवसांपासून आशिष साखरकर उपचार घेते होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. आशिष यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आशिष हे प्रत्येक बॉडीबिल्डिंग करणाऱ्या तरुणांसाठी आयकॉन होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.