घरबसल्या करा आधारकार्ड अपडेट, सरकारने वाढवली मुदत

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आता तुम्ही घरबसल्या तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकतात तेही अगदी फ्री मधे.. आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी आधी 14 मार्च 2024 ही मुदत निश्चित करण्यात आली होती. आता मात्र त्यासाठीची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता 14 जून 2024पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे. यूआयडीएआयने सोशल मीडिया पोस्टद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे.

14 जूनपर्यंत  आधार कार्डवरचे तपशील मोफत अपडेट करण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. ही मोफत सेवा फक्त माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे. या मुदतवाढीचा कोट्यवधी नागरिकांना उपयोग होणार असून नागरिकांना आपली डॉक्युमेंट्स अपडेट करण्याची पूर्ण संधी मिळावी, यासाठी यूआयडीएआयने हा निर्णय घेतला आहे.

आधार ऑनलाइन अपडेट करायचं असेल, तर सर्वांत आधी https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर जावं. तिथे आधार नंबर आणि ओटीपीच्या साह्याने लॉगिन करावं. लॉगिन झाल्यानंतर प्रोफाइलवर आपली ओळख आणि पत्ता, तसंच अन्य तपशील दिसू लागतील. आपली माहिती योग्य असल्यास व्हेरिफाय या पर्यायावर क्लिक करावं. त्या माहितीत बदल झाला असेल, तर नवं ओळखपत्र अपलोड करण्याचा पर्याय निवडावा आणि ते अपलोड करावं. पत्त्याचा पुरावा अपलोड करण्यासाठी योग्य ते डॉक्युमेंट निवडून अपलोड करावं लागेल. सबमिट पर्यायावर क्लिक केल्यावर ते डॉक्युमेंट अपलोड होईल.

आधार कार्ड ऑफलाइन अपडेट करायचं असेल, तर सर्वांत आधी https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या वेबसाइटवर जावं. तिथे आपल्या जवळच्या आधार केंद्रांची माहिती आपल्याला मिळू शकेल. त्यासाठी आपलं लोकेशन शेअर करावं किंवा पिन कोड टाकावा. त्यानंतर आपल्या सोयीच्या आधार सेंटरमध्ये जाऊन माहिती अपडेट करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.