जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

0

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष सुरेश मोरे असे आरोपीचे नाव आहे.

विशाल राजु अहिरे (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) व त्याचे साथीदार टोळीने दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजल्यावरून त्यांनी ४ रोजी ११ : ३० वाजेच्या सुमारास मेहरुण स्मशानभूमीजवळ असलेल्या उद्यानाजवळ विशाल राजू अहिरे, आशुतोष सुरेश मोरे (रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव), गोपाल चौधरी, दिक्षांत उर्फ दादु सपकाळे, शुभम धोबी आदी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने याठिकाणी जमले होते. .त्यांची दरोडा टाकण्याची तयारी सुरु असताना पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच यातील काही जणांनी धूम ठोकली मात्र विशाल हा सराईत गुन्हेगार पोलिसांना गवसला . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.