प्रा.डॉ.पद्माकर पाटील यांचा दणदणीत विजय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
फैजपूर – धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. पद्माकर ज्ञानदेव पाटील यांनी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या निवडणुकीत अधिसभा सदस्य (सिनेट) पदी ओबीसी प्रवर्गातून प्रचंड मतांनी विजय मिळविला, त्याच प्रमाणे पदार्थविज्ञान या विषयाच्या अभ्यास मंडळावर निवडून आलेले डॉ.उदय जगताप व कॉम्प्युटर मॅनेजमेंटम या विषयाच्या अभ्यास मंडळावर बिनविरोध निवडून आलेले डॉ. रवी केसुर यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी, प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी, यांनी बुके देवून सन्मान केला.
डॉ.ज्ञानदेव पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना (एनमुक्टो) चे अधिकृत उमेदवार होते या संघटनेतर्फे अकॅडमीक कौन्सिल साठी 5 आणि आधी सभेसाठी 10 असे एकूण 15 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी एकूण 13 उमेदवार प्रचंड मतांच्या फरकाने निवडून आले, तसेच चित्र सर्वच अभ्यास मंडळांच्या सर्वच विषयात होते विरोधी मुक्ता संघटनेला याही ठिकाणी प्रचंड पराभव पत्करावा लागला एनमुक्टो आणि मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या आघाडीने एकतर्फी विजय मिळवित आपले वर्चस्व कायम राखले आहे. यात विजयी उमेदवार डॉ. पद्माकर पाटील यांनी सांगितले की प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी या सर्व प्रक्रियेत केलेली मदत कधी ही न विसरण्यासारखी आहे तसेच आघाडीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी या सर्वांनी जे सहकार्य केले ते पाहता या विजयाचे सर्व श्रेय अपना सर्व मंडळीना आहे म्हणून मी सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो असे मत या प्रसंगी डॉ. पद्माकर पाटील यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ.विजय सोनजे यांनी सांगितले की आज जो प्रचंड विजय मिळाला आहे त्याचे शिल्पकार संघटनेचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील हेच आहेत तसेच सोबत जीवाचे रान करून लढणारे सचिव डॉ.गौतम कुवर, खजिनदार प्रा.ई.जी.नेहते, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.किशोर कोल्हे, सचिव डॉ.ए.डी.गोस्वामी, धुळे जिल्हा अध्यक्ष डॉ.दिनेश पाटील, सचिव डॉ.संजय खैरनार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अधिकार बोरसे, सचिव डॉ. सुरेश पाटील, तसेच मागासर्गीय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष.डॉ.जयवंत मगर,सचिव डॉ.अनिल हिवाळे,संस्थापक अध्यक्ष प्रा.बी.ए.संदानशिव,सचिव डॉ.डी.आर.तायडे, डॉ.शरद बिऱ्हाडे, दोन्ही संघटनेचे (आघाडीचे) तीन ही जिल्ह्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या परिश्रमाने हे यश मिळविता आले त्यांचा ही वाटा यात खूप मोठा आहे असे मत व्यक्त केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पी. आर.चौधरी यांनी सरकारची दडपशाही ची भूमिका आणि त्याला न जुमानता प्राध्यापकांच्या हिताचे संरक्षण करणारी एकमेव संघटना फक्त एनमुक्टो हीच संघटना आहे ती पूर्वी ही तशीच होती आणि आज ही तशीच आहे या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो, परंतु काही मूठभर लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी यातून वेगळे होतात आणि संघटनेत फूट पाडून सरकारचे मनसुभे पूर्ण करण्यासाठी वाट मोकळी करून देतात, त्यांच्या या चुकीच्या गोष्टीमुळे येणाऱ्या पिढीला भविष्यात खूप मोठे नुकसान सोसावे लागणार आहे, हे त्यांनी अजाच लक्ष्यात घ्यावे आणि वेळीच जागे व्हावे असे आवाहन केले, प्रसंगी अध्यक्षांचे स्वागत डॉ.ताराचंद सावसाकडे व डॉ.पंकज सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्र संचालन व आभार प्रा.शिवाजी मगर, सचिव,स्थानिक शखा यांनी केले,सभेसाठी सर्व प्रद्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.