भगवंताचे मंदिर हे संस्काराचे स्थान – भागवतार्च लोकेशानंदजी महाराज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
शेंदुर्णी – श्रीमद् भागवत कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकाची गर्दी भाविक अतिशय भक्ती रसात न्हावून निघत आहे .बारी मंगल कार्यालय येथे सुरु झालेली श्रीमद भागवत कथा शहादा येथील प्रसिद्ध भागावताचार्य श्री लोकेशानंदजी महाराज यांच्या सुमधूर वाणी ने ऐकण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत आहे आज भागवत कथेचा चौथा दिवस होता.
भगवताला नमस्कार करतांना पुरुषानी दंडवत घालून नमस्कार केला पाहिजे आणि दिवसातून तीन वेळा आपन दंडवत प्रमाण घालावा त्यामुळे आपोआप आपल्या शरीराचा व्यायाम होतो असे सुद्धा महाराजांनी सांगीतले आपण आपल्या आयुष्यामध्ये भगवंताचे नामस्मरण भक्ती केली तर आपल्याला कोणत्याही प्रकार च्या ग्रहाचा आपल्यावर वाईट परिणाम होणार भगवान नारायण हेच सर्व श्रेष्ठ आहे हे सुद्धा महाराजानी सांगीतले

महाराजानी भगवान विष्णूच्या वामन अवताराची कथा सांगितली बळीराजाला स्वर्गलोक जिंकायचा होता म्हणून त्याने विष्णू प्रयाग यज्ञ केला त्याप्रसंगी भगवान विष्णू यांनी बटकू ब्राम्हणाचे रूप घेवून बळीराजाला तीन पग धर्ती मागीतली आणि दोन पग मधे सर्व व्यापून घेतले तिसरा पग ठेवण्यासाठी बळीराजाजवळ काही उरले नाही आणि बळीराजाने आपले मस्तक पुढे करून आपला शब्दपूर्ण केला माप्रसंगी महाराज म्हणाले आपल्या जवळ कितीही असले, तरी आपन समाधानी राहत नाही आपण समाधानी असायला हवे असे महाराजांनी सांगीतले आपल्या जीवनामधे जो मोह आहे तो भक्ती मार्गाने आपन मोहापासून दूर जावू शकतो परमेश्वर भक्ती हीच खरी भक्ती असे सुद्धा महाराजांनी सांगीतले महाराजांनी आज तेलगू भाषेतील भजन सादर केले त्या भजनावरती सारा भक्तीसमुदाय भजनामधे दंग होवून नाचत होता शेवटी गावातील मान्यवरांच्या हस्ते २१ जोडण्यानी आरती केली

Leave A Reply

Your email address will not be published.