जळगाव विधानसभेसाठी भाजप- सेना युती ठरणार कळीचा मुद्दा (चांगभलं)

0

धों ज. गुरव –

लोकसभेची निवडणूक संपली. भाजपने 14 चे रेकॉर्ड तोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदीची सुप्त लाट नव्हे तर त्सुनामी होती आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप- सेनेची युती असल्याने 48 पैक 41 जागा भाजप सेनेने जिंकल्या. भाजप – सेनेची युती यापुढे कायम राहील असे दोन्ही पक्षातर्फे सांगण्यात येते. त्यामुळे भाजप सेनेतर्फे आमदारकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. जळगाव शहर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार राजुमामा भोळे असले तरी 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप- सेना युती ऐनवेळी फिस्कटली. त्यामुळे परंपरेने शिवसेनेचा मतदार संघ असलेल्या जळगाव शहर विधानसभा मतदार माजी मंत्री हे 14 ची निवडणूक वगळता कायम निवडून आलेले आहेत. 14 च्या विधानसभा निवडणुकीत ते कारागृहात असतांना त्यांनी निवडणूक लढविली. निवडरुक प्रचारात सुरेशदादा जैन यांच्या अनुपस्थितीतीचा लाभ भाजपचे राजुमामा भोळे यांना मिळाला आणि ते निवडून आले. आता भाजप- सेना युती घट्ट् झाली आहे. त्यामुळे जळगाव शहर विधानसभा मतदार संघ भाजपकडे जातो की शिवसेनेकडे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजप सेनेने युतीधर्म पाळला तर या मतदार संघावर शिवसेनेचाच अधिकार राहणार आहे. शिवसेनेकडे जळगाव शहर मतदार संघ गेला तर विद्यमान आमदार राजुमामा भोळे यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

भाजप – सेनेची युती होईल तेव्हा होईल परंतु जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजप – सेना पीात अनेक जण इच्छुक आहेत. त्याचबरोबर विरोधी काँग्रेस पक्षांमध्येही आमदारकीची  निवडणूक लढविण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपमध्ये विद्यमान आमदार राजुमामा भोळे हे तर उमेदवारी मिळण्याचा दावा करतात. परंतु भाजपमध्येही आता अंतर्गत गटबाजीला उत आला आहे. महानगरपालिका निवडणुकी नंतर महापौरपदासाठी राजुमामांनी आपली पत्नी सौ. सीमा भोळे यांच्या नावाचा आग्रह धरून महापौरपद पटकावून घेतले. त्यामुळे अनेक भाजप नगरसेवकांची नाराजी मामांनी ओढवून घेतली. एकच घरात शहराचे आमदारपद आणि महापौरपद हा मुद्दा नगरसेवकात चर्चिला जातो महापौरपद आणि आमदारकी असेल तर शहराचा विकास साधणे सोपे होईल अशी राजुमामांनी भूमिका मांडली. तथापि गेल्या वर्षभरात अथवा आमदारकीच्या साडेचार वर्षाच्या कारकीर्दीत जो विकास अपेक्षित होता तो झाला नाही एवढे मात्र निश्चित. व्यापारी गाळ्याांचा प्रश्न अद्याप सुटला नाही. जळगाव शहरातील समांतर रस्त्याचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. दुष्काळात शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे जे नियोजन व्हायला हवे ते झालेले नाही. शहरातील रस्ते सुधारले नाहीत. शिवाजीनगर उडडाण पुलाला पर्यायी रस्ते करण्यात अपयशी ठरले. शहरातील अतिक्रमणाची समस्या जैसे थे अवासून उभी आहे. घनकचर्यााची समस्या कायम आहे. महानगरपालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 कोटी रूपयांच्या विकास कामाचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे आमदार भोळेंविषयी कमालीची नाराजी आहे. भाजपमध्येच नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर ललीत कोल्हे हे आमदारकीसाठी प्रयत्नशील आहेत.

जळगाव शहर विधानसभेची जागा युतीमुळे शिवसेनेलाच मिळणार असे शिवसेना कार्यकर्त्यांचा वाटते. जळगावचे शिवसेनेचे नेते माजी आमदार सुरेशदादा जैन हे निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले असल्याने या जागेसाठी शिवसेनेतून अनेकजण इच्छुक आहेत. त्यात माजी महापौर विष्णु भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर रमेशदादा जैन, माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यात माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. ही सर्व नावे चर्चित असले तरी सुरेशदादा जैन यांचेवतीने जे नाव सुचविले जाईल त्यावर शिक्कामोर्तब होईल एवढे मात्र निश्चित.

लोकसभेत युती झाल्यानंतर आता जिल्ह्यातील इतर संस्तांमध्ये सुद्धा भाजप बरोबर शिवसेचाही समावेश व्हावा अशी मागणी पुढे आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर भाजप – शिवसेना सदस्यांची जेवणावळी झाली. जिल्हा परिषद दुसर्याा क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला आता कशा प्रकारची संधी दिली जाते याकडे लक्ष लागलेले आहे. त्यानंतर 10 महिन्यापूर्वी झालेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप – सेना यांची वेगळ चूल होती. त्यामुळे 57 नगरसेवक भाजपचे तर 15 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आता या 15 नगरसेवकांपैकी किती जरांना कोणती पदे मिळतात. यावरही बरेच काही अवलंबून आहे.

भाजप – सेना युतीचा प्रश्न भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन आशि शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर सहकार रायमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची चांगली भूमिका पार पडली आहे. अमळनेरच्या दांगडो झालेल्या प्रचार सभेतही मंत्री गिरीश महाजनांसमवेत जो रुद्रावतार दाखवला तो लक्ष्यवेधी होता. त्यामुळे गिरीश महाजन, सुरेशदादा जैन आणि गुलाबराव पाटील यांनी एकमताने जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचा युतीचा तिढा सहज सुटू शकतो. त्यामुळे युतीत ही जागा कुणाला मिळते. यावर मात्र जळगाव शहराचे राजकारण अवलंबून आहे. तसेच भाजप अथवा सेना यापैकी कुणाच्या वाट्याला ही जागा जाते त्या पीाचा उमेदवाराला निवडून येण्याची फार मोठी संधी उपलब्ध राहणार आहे. कारण जळगाव महानगरपालिकेत 75 पैकी 72 नगरसेवक भाजप सेनेचे आहेत. दोन अडीच महिन्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुक प्रक्रियेला सुरुवात होईल. भाजप – सेनेचे युती कशा पद्धतीने होते यावरच सर्व काही अवलंबून आहे. तरी सुद्धा राजकारणात कााही ही होऊ शकते असे म्हणतात भाजप सेना युती झाली नाही तर चिि मात्र वेगळे राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.