नवाजुद्दीनवर घर सोडण्याची वेळ आली?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Actor Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीनची पत्नी आलिया आणि आई मेहरुनिसा यांच्यामध्ये संपत्तीवरून वाद सुरू आहे. नवाजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दिकी यांनी नुकतीच सूनेविरोधात एफआयआर दाखल केली होती. तर नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता नवाजुद्दीनवर घर सोडण्याची वेळ आली आहे. या वादामुळेच त्याला सध्या हॉटेलमध्ये राहावं लागत आहे.

आलिया आणि नवाजुद्दीनने 2010 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुलं आहेत. 6 मे 2020 रोजी आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोट देण्यासाठी अर्ज केला. मात्र नंतर 2021 मध्ये तिने तो अर्ज मागे घेतला. कोविडदरम्यान नवाजुद्दीनने मुलांची आणि तिची काळजी घेतल्याने आलियाने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. “मला कोविडची लागण झाली होती. त्यावेळी नवाजुद्दीनने फक्त मुलांची नाही तर माझी पण काळजी घेतली. मी त्याच्याविषयी जे काही म्हणाले, त्यानंतरही त्याने माझी मदत केली. कोरोना महामारीमुळे माझे डोळे उघडले”, अशी कबुली आलियाने दिली होती.

मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले होते. “लग्नाआधी आणि लग्नानंतरही आमच्यात खूप भांडणं झाली. मी जेव्हा गरोदर होते, तेव्हा मलाच स्वत:ची सर्व काळजी घ्यावी लागली होती. माझ्या डिलिव्हरीच्या वेळीही तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर बोलत होता. फोनबिल्सवरील माहितीमुळे मला हे सर्व समजलं”, असं ती म्हणाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.