संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त काव्य रत्नावली चौकात प्रतिमा पूजन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

चर्मकार विकास संघातर्फे संत रविदास महाराज यांच्या ६४६ व्या जयंतीनिमित्त काव्य रत्नावली चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आ. सुरेश भोळे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्‍वनाथ सावकारे, जिल्हाध्यक्ष चेतन तायडे, जिल्हा उपाध्यक्ष गजातन दांडगे, जिल्हा सचिव धनराज भारुडे, विजय पवार,डॉ. सुनील सूर्वचंशी, वावडदा येथील सरपंच राजू वाडेकर, अर्जुन भारुडे, दीपक नेटके, कमलाकर ठोसरे, संदीप ठोसरे, कुणाल तायडे, डॉ. सुनील निभोरे, कॅलास वाघ , हिरामण सोनवणे, एकनाथ शिरोळे, दीपक नेटके, संदीप शेगोकार, जितेंद्र वानखेडे, विजय काकडे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गजानन दांडगे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.