३२ वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील शांतीनगर भागातील राहत्या घरात ३२ वर्षीय इसमाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज ६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सचिन अरुण वाडेकर (वय ३२, रा. गाळण खु” ता. पाचोरा ह. मु. शांतीनगर, पाचोरा) हे सुतारीकाम काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. दि. १० फेब्रुवारी रोजी गाळण ता. पाचोरा येथे सचिन वाडेकर यांच्या चुलत भावाचे लग्न असल्याने परिवारीतील सर्व सदस्य हे गाळण येथे गेले असता. सचिन वाडेकर यांनी ६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना सचिन वाडेकर यांनी भाडेतत्त्वावर असलेल्या शांतीनगर येथील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सदरचा प्रकार दिलीप वाघ हे त्यांना कामावर जाण्यासाठी बोलविण्यास गेले असता त्यांच्या लक्षात आला. घटनेची माहिती घर मालक यांनी पाचोरा पोलिसांना दिली असता पोलिस कर्मचारी व रुग्णवाहिका चालक बबलु मराठे घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने सचिन वाडेकर यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सचिन वाडेकर यांना मृत घोषित केले.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करीत आहेत. मयत सचिन वाडेकर यांच्या पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. सचिन वाडेकर यांच्या अकस्मात मृत्यूने गाळण गावात शोककळा पसरली आहे. सचिन वाडेकर यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.