तरसोद येथे कॅन्सर जनजागृती रॅलीसह पथनाट्य सादर

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जागतिक कॅन्सर दिनानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे ४ फेब्रुवारी रोजी तरसोद गावामध्ये कॅन्सर जनजागृती व प्रतिबंध कसा घालावा याकरीता विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागातर्फे जागतिक कॅन्सर दिनानिमित्‍त रॅलीसह पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विविध अवयवांचे होणारे कर्करोग उदा महिलांमध्ये होणारा स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर), मुखाचा कर्करोग (ओरल कॅन्सर) याबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांचा वापर करत हातात फलक घेऊन संपूर्ण गावातून रॅली काढली. धूम्रपान व मद्यपान टाळण्याकरीता विविध संदेश पोस्टर्स तसेच पथनाट्याद्वारे सादरीकरण करण्यात आले.

हा उपक्रम मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागाच्या प्रमुख प्रा.मनोरमा कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सागर मसने, प्रा.प्रशिक चव्हाण, प्रा.रश्मी टेंभुर्णे, प्रा.शुभांगी गायकवाड, प्रा.पूनम तोडकर, प्रा.प्रिती गायकवाड, प्रा.दिपाली गोटे यांनी यशस्वीरित्या पार पाडला.

Leave A Reply

Your email address will not be published.