रेल्वे मालगाडीतून गव्हाचे पोते लांबविणाऱ्या कुरंगीच्या दोघांना अटक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

माहिजी रेल्वे स्थानकावरून उभ्या मालगाडीतून 35 गव्हाचे पोते लांबविणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना भुसावळच्या रेल्वे न्यायालयात हजार केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , माहेजी विभागात गुन्हेगारी प्रतिबंधक कर्तव्यावर तैनात असलेले कॉन्स्टेबल विनोद जेठवे, कॉन्स्टेबल पंकज वाघ, यांना ४ फेब्रुवारी रोजी सूत्रांकडून माहिती मिळाली की, २७ ,२८ जानेवारी रोजी माहेजी रेल्वे स्थानकाच्या लूप लाइनवर यार्डमध्ये थांबलेल्या मालगाडीचा दरवाजा उघडून विनोद श्रावण भोई वय २७ आणि राहुल नामदेव कोळी या दोघांनी मिळून गव्हाचे पोते चोरले. आणि हे सर्व पोती कुरंगी गावातील राहुल उर्फ ​​चेतन याच्या घराच्या व्हरांड्यात ठेवल्या.

अशी माहिती मिळाल्याने हवालदार विनोद जेठवे, हवालदार पंकज वाघ यांनी कुरंगी गावात राहुलच्या घरासमोरील व्हरांड्यातून विनोद श्रावण भोई याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने २७ व २८ जानेवारी रोजी त्याचा साथीदार राहुल नामदेव कोळी याच्यासोबत रात्री ११ ते ५ वाजेपर्यंत माहेजी रेल्वे स्टेशन यार्डच्या अप लूप मेन लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीच्या वॅगनचा दरवाजा तोडला.

यामध्ये मध्य प्रदेश स्टेट सिव्हिल सप्लाय कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ४ नग गव्हाचे पोते ५० किलो प्रत्येकी, १ नग किंमत रु.७५०/- एकूण किंमत रु.३०००/-, ३१ नग गव्हाच्या गोणी पोत्या ४० किलो वजन, ज्याची एकूण किंमत रु. १८,६०० एकूण ३५ नग गव्हाच्या गोण्या ज्यांचे एकूण वजन १४४० किलोग्रॅम आहे, एकूण किंमत अंदाजे रु. २१ हजार ६०० रुपयांच्या स्वतःच्या हिरो होंडा कंपनीच्या मोटार सायकलवरून २-२ पोती चोरून सर्व पोते घराच्या व्हरांड्यात ठेवल्या होत्या. १८ फेऱ्या करून राहुल च्या घरात आणल्या . गोणी कोणी ओळखणार नाही म्हणून गव्हाच्या १५ पोती बदलून इतर पोत्यांमध्ये गहू ठेवला.

विनोद आणि राहुलने बाहेर काढलेल्या गव्हाच्या १५ रिकाम्या पोत्यांचे आवरण जाळून टाकले. तो इतर २० गोण्या बदलू शकला नाही. सर्व गोण्यांच्या पिशव्या बदलल्यानंतर तो पोती पाचोराबाजारात विकणार होता. कॉन्स्टेबल विनोद जेठवे, कॉन्स्टेबल पंकज वाघ यांनी निरीक्षक जळगाव यांना याबाबत माहिती दिल्यानंतर निरीक्षक मोहित कुमार ,हे. कॉ. मिलिंद तायडे आदी कुरंगी गावात पोहोचले, घटनास्थळी पंचनामा करून पंचासमक्ष गव्हाची पोती जप्त करण्यात आली.४ रोजी, आरपीएफ स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे न्यायालय भुसावळ येथे हजर केले असता आरोपीना ३ दिवसांची आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.