5G लागू करणं भारताची प्राथमिकता असावी: मुकेश अंबानी

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

देशातील सर्वात मोठी टेक इव्हेंट इंडिया मोबाइल काँग्रेस 2021 ची पाचवी आवृत्ती बुधवारी 8 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले.

मुकेश अंबानी म्हणाले की, एकीकडे भारत आपल्या कोविड-19  लसीकरण मोहिमेत  अभूतपूर्व प्रगती करत आहे. दुसरीकडे यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा उच्च विकासाच्या मार्गावर आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. या दोन मोठ्या कामांच्या यशात आमच्या उद्योगाचे योगदान महत्त्वाचे आहे. मला विश्वास आहे की, भारत भविष्यात कोविडच्या कोणत्याही लाटेवर नियंत्रण मिळवण्यात केवळ यशस्वी होणार नाही तर भारताचे आर्थिक पुनरागमन जगाला आश्चर्यचकित करणारे ठरेल.

तसेच  मुकेश अंबानी म्हणाले की, भारताने लवकरात लवकर 2G वरून 4G आणि नंतर 5G कडे स्थलांतर पूर्ण केले पाहिजे. कोट्यवधी भारतीयांना सामाजिक-आर्थिक पिरॅमिडच्या तळाशी 2G पर्यंत मर्यादित ठेवणे त्यांना डिजिटल क्रांतीच्या फायद्यांपासून वंचित ठेवत आहे. कोविडमध्ये आपण पाहिलं की जेव्हा सगळं बंद होतं, तेव्हा फक्त इंटरनेट आणि मोबाइलनं आपल्याला जिवंत ठेवलं होतं. तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा आणि रोजगाराचा आधार बनलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.