500 रुपयांच्या इतक्या नोटा सापडल्या कि पोलिसांना घाम फुटला; त्यानंतर जे घडलं ते…

0

 

जोधपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राजस्थानमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार, कार्यकर्ते सर्वच जण पूर्णपणे सक्रिय आहेत. यासोबतच राज्याचे पोलीसही चांगलेच सक्रिय आहेत. रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी आहे. सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे. वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. दरम्यान, जोधपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका वाहनातून 1 कोटी 97 लाख रुपये जप्त केले.

ते खरे असल्याचे समजून पोलीस कारवाई करत होते.

यावेळी पोलिसांना ५०० रुपयांचे बंडल सापडले. या नोटा बनावट असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या नोटा खऱ्या असल्याचे लक्षात घेऊन पोलीस कारवाई करत होते, मात्र त्याच सीरिजच्या नोटांचे अनेक बंडल सापडल्यानंतर पोलिसांना संशय आला. त्यानंतर जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा बनावट असल्याचे उघड झाले.

एकाला अटक

याप्रकरणी पोलिसांनी हनुमंत नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती नागौर येथून येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या पैशातून तो जमिनीचा व्यवहार करणार होता. हा व्यवहार होण्यापूर्वीच पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान वाहनातून ही रक्कम जप्त केली. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.