370 कलम हटवून काश्मीरमध्ये काय बदल झाला? संजय राऊतांचा भाजपला सवाल

0

मुंबई । चार दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांना मज्जाव करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काश्मीर नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तरुणांना श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावू न देणे हा भारताच्या संविधानाचा सगळ्यांत मोठा अपमान केला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय जनता पार्टीचे चार कार्यकर्ते तिथे तिरंगा फडकवायला गेले होते. त्यांना पोलिसांनी तिकडून पकडून पुन्हा पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांना तिरंगा फडकावण्यापासून रोखण्यात आलं. श्रीनगर, काश्मीर भारताचं अविभाज्य अंग असल्याचं आपण नेहमीच सांगतो. 370 कलम आता हटवण्यात आलं आहे. तरीसुद्धा आम्ही आमच्या लोकांना तिकडे तिरंगा फडकावण्यापासून रोखत असू, तर काश्मीरमध्ये काय बदल झाला आहे हा लोकांच्या मनात प्रश्न आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

 

मेहबुबा मुफ्तीच कशाला फारुख अब्दुल्लाही बोलले होते, कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ, चीनच्या मदतीनं त्यांना 370 पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू करायचे आहे. तर केंद्रानं कठोर पावलं उचलायला हवीत. मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला हे दोन्ही काश्मीरमधले नेते ज्या पद्धतीनं तिरंग्याबाबत बोलतात हा तिरंग्याचा अपमान आहे. हा देशाच्या घटनेचा अपमान आहे. हा घटनेच्या स्वातंत्र्याचा अपमान असल्याचंही संजय राऊत यांनी अधोरेखित केलं आहे. जोपर्यंत काश्मीरमध्ये पुन्हा 370 कलम लागू होत नाही, तोपर्यंत तिरंगा फडकावणार नाही, असं सांगणं हा 130 कोटी जनतेचा अपमान आहे.

 

फारुख अब्दुल्ला देशाविरोधात बंडाची भाषा करत आहेत, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी. काश्मिरी पंडितबाबत हा केवळ प्रश्न नाही तर काश्मीर देशात आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. मोदी आणि अमित शाह असताना ही परिस्थिती दुर्दैवी आहे, असंसुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत. या देशात समान नागरी कायदा लागू व्हायला हवा. सरकारनं अशा प्रकारचा कोणता कायदा आणल्यास आम्ही निर्णय घेऊ. बिहारचं वातावरण आता बदललं आहे आणि तेजस्वी यादव लिड करत असल्याचं वाटतंय. काश्मीर भारतात आहे की नाही, हा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.