‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त बाईक ; मायलेज आहे ९० kmph

0

मुंबई | सध्या दसरा दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाजारात गर्दी करताना दिसत आहे. याच मुहूर्तावर वेगवेगळ्या कंपन्या आपले नवनवीन प्रोडक्ट लाँच करत आहे.

 

याच मुहूर्तावर आता दुचाकी उत्पादक कंपनी बजाजने आपली सर्वात स्वस्त बाईक लाँच केली आहे. Bajaj CT100 चा नवीन मॉडेल भारतात लाँच झाला असून ‘Kadak’ असे या मॉडेलचे नाव आहे.

 

कंपनीने या मॉडेलला नवीन फीचर्स सोबत चांगले मायलेजदेखील दिले आहे. कंपनीने ‘kadak’ हे मॉडेल ९०kmph मायलेज देत असल्याचे म्हटले आहे. तसेच किंमतीच्या बाबतीत देखील ही सर्वात स्वस्त बाईक असून बाईकची एक्स-शोरूम किंमत ४६, ४३२ रुपये इतकी आहे.

 

कंपनीने या मॉडेलमध्ये ८ नवीन फीचर्स दिले आहे. त्यात रबर टॅंक पॅड, स्थिरतेसाठी क्रॉस ट्यूब हँडलबार, इंटिग्रेटरसाठी क्लीन लेन्स असे अनेक नवनवीन फीचर्स या मॉडेलमध्ये देण्यात आले आहे.

 

तसेच कंपनीने या मॉडेलच्या इंजिनमध्ये जास्त बदल केलेले नाही. ९९.२७cc एअर कूल सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.  जे ७५००rpm वर ८.१bhp पॉवर आणि ५५००pm वर ८.०५Nm टॉर्क जनरेट करते.

Leave A Reply

Your email address will not be published.