अभिनेत्री अश्विनीताई महांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त किलज येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0

तुळजापूर (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील किलज येथे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा अश्विनीताई महांगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते, या मध्ये या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पाटील क्लिनिक सलगरा (दि.) येथील डॉ.सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य खंडेराव शिंदे, ज्ञानेश्वर कुठार, बालाजी शिंदे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश मातोळे, सदस्य भरत गवळी सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सध्याच्या काळात आरोग्य जपण हे अत्यंत आवश्यक असून वेळोवेळी तपासण्या करणे गरजेचे आहे. या हेतूने रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता. या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखिल करण्यात आले, या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सदस्य युवावक्ते राम जळकोटे यांनी केले, तर शेवटी आभार प्रदर्शन गणेश काटे यांनी केले.

 

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हे शिबीर पार पडले, या वेळी प्रसाद राजमाने, मनोज देवकते, वैभव मुळे, गणेश काटे, प्रतिक भोसले, अविष्कार फस्के, राम जळकोटे, आणि शुभम नलावडे हे प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. या अनोख्या कार्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या वतीने डॉ. सचिन पाटील यांचा शेवटी आभारपर सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.