Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बांधकाम व्यवसायिकाची १ कोटी रुपयाची फसवणूक करणाऱ्याला भूजमधून अटक
    गुन्हे वार्ता

    बांधकाम व्यवसायिकाची १ कोटी रुपयाची फसवणूक करणाऱ्याला भूजमधून अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 21, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;– खोटी कागदपत्र दाखवित त्यांना जास्त रकमेचा मोबदल्याचे अमिष दाखवून बांधकाम व्यवसायिकाची १ कोटी रुपयाची फसवणूक करणाऱ्या नंदू सुदाम बोरसे याला गुजरातमधील भूज येथून तालुका पोलिसांनी अटक केली. तसेच दोघ संशयित भावंडे हे फसवणुकीची रक्कम हवालामार्फत मुंबई, दुबईसह इतर ठिकाणी पाठवित असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. संशयित नंदू बोरसे याला न्यायालयात हजर केले असता त्यास २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

    शहरातील रेणुका नगरात भाऊसाहेब भाऊराव पाटील हे व्यावसायीक वास्तव्यास आहे.

    त्यांना नंदू सुदाम बोरसे व त्यांचा भाऊ दिपक सुदाम बोरसे यांनी त्यांच्या झेरॉक्स २४ फर्मची बनावट कागदपत्र दाखविली. तसेच तुम्हाला जास्त रकमेचा मोबदला मिळेल असे अमिष दाखवून त्यांच्याकडून १ कोटी रुपयांची फसवणुक केली होती. त्यानंतर संशयितांनी पिंप्राळा

    शिवारातील फ्लॅट विकत घेतला आहे. याप्रकरणी भाऊसाहेब पाटील यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशयितांच्या शोधार्थ असतांना त्यांना नंदू बोरसे यांच्या मोबाइलचे लोकेशन गुजरात राज्यातील भूज येथे असल्याचे कामकाज पाहिले.

    समजले. त्यांनी लागलीच पथक तयार करुन स्थानिक पोलिसांची मदत घेवून नंदू बोरसे याच्या दि. १९ रोजी मुसक्या आवळल्या. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या संशयिताला त्याचा भाऊ दीपक याच्याबाबत विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

    दरम्यान, बुधवारी २० सप्टेंबर रोजी संशयिताला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीखक अनंत अहिरे करीत आहे.

     

    #crime #fraud jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif