चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सकाळ होणार; इस्रोची माहिती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

चंद्रमोहिम चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर भारताने इतिहास रचला आहे. आता सर्व जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. दरम्याना आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पुन्हा एकदा सकाळ होणार आहे. यासोबतच लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले  22 सप्टेंबरला सूर्याची किरणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचतील. यानंतर इस्रोकडून पुन्हा एकदा लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

https://x.com/ISROSpaceflight/status/1704416939962175725?s=20

 

सध्या स्लीप मोडमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे दोघेही सध्या स्लीप मोडमध्ये आहेत. चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्यापूर्वी इस्रोने या दोघांना केवळ 14 दिवसांचे काम सोपवले होते, मात्र हे चंद्रावर पोहोचल्यानंतर रात्री संपल्यानंतर हे दोघेही पुन्हा एकदा कामाला सुरुवात करू शकतात, असे सांगण्यात आले होते. लँडर आणि रोव्हरला जागे करण्यात इस्रोला यश आले तर ते दुहेरी यश ठरणार आहे. हा एकप्रकारे इस्रोसाठी बोनस असणार आहे. लँडर विक्रमने २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर आले आणि १२ दिवस त्याने इस्रोला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर रोव्हर स्लीपिंग मोडमध्ये गेले. पृथ्वीच्या १४ दिवसांइतका चंद्रावर एक दिवस आणि रात्र असतो.

 

पुरेशी ऊर्जा मिळवण्यासाठी लँडर आणि रोव्हरची उंची सूर्याच्या ६ ते ९ अंशांमध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळेच रोव्हर प्रज्ञान ने रात्री पडण्याच्या एक दिवस अगोदर विश्रांती घेण्यास सुरुवात केली. रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानही उणे २४० अंशांपर्यंत जाते. अशा परिस्थितीत चंद्राच्या पृष्ठभागावर टिकून राहणे सोपे काम नाही. दरम्यान चांद्रयान-३ मध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे जे कमी तापमानातही खराब होत नाहीत आणि ऊर्जेची बचत करतात. आता लँडर आणि रोव्हरने त्यांची बॅटरी वाचवून ठेवली आहे की नाही यावर ते २२ सप्टेंबर रोजी जागे होणार की नाही ते ठरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.