सेंट्रींग काम करतांना विजेचा धक्का लागल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

एरंडोल तालुक्यात १९ वर्षीय मजूर युवकाचा खेडगाव तांडा येथे घराचे सेंट्रींग काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समाधान साहेबराव महाजन (19) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समाधान हा जवळपास तीन वर्षापासून बांधकामाचे सेंट्रींग कामावर मजूर म्हणून काम करत होता सोमवारी 8 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विजेच्या धक्का लागल्याने त्याचे दुर्दैवी निधन झाले. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने सर्वत्र हळहळ होत आहे. दरम्यान सायंकाळी उशिरा म्हसावद येथे शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.