भुसावळ विभागातील १५ रेल्वे स्टेशन्सचा होणार कायापालट…

0

 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

“अमृत भारत निर्माण योजने” अंतर्गत रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी एक देशव्यापी भव्य अशी सुमारे 24 हजार 470 कोटी रुपयांची योजना आखली असून पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील अत्याधुनिक भारत उभारणीसाठी भुसावळ रेल्वे विभागात देखील 290 कोटी रुपये खर्चाचे प्रायोजन करण्यात आले आहे. यात भुसावळ विभागातील एकुण 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन केले जाणार असून मनमाड रेल्वे स्थानकावर त्या संदर्भात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहीती भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौ.इति पांडे यांनी दिली.

भुसावळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ.पांडे या बोलत होत्या. यावेळी वरिष्ठ कार्मिक अधिकारी धमेंद्र सिंग, मुख्य समन्वयक (गती शक्ती) तरुण दंडुलीया व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सौ. पांडे म्हणाल्या की, देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयामार्फत देशभरातील 1 हजार 309 रेल्वे स्थानकांची पुर्नबांधणी करण्याची 24 हजार 470 कोटी रुपयांची, भव्य योजना आकारली आहे. त्या अंतर्गत भुसावळ रेल्वे विभागात एकूण 15 रेलवे स्थानकांचे काम हे पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मनमाड, देवळाली, नांदगाव, लासलगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर, पाचोरा, चाळीसगाव, धुळे, नेपानगर, सावदा व रावेर या स्थानकांच्या समावेश करण्यात आला आहे. यामधील बहुतांशी कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी सकाळी 11 वा. या भव्य प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. भुसावळ विभागातील मनमाड रेल्वे स्थानकावर या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल आहे. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित रहातील. त्या पुढे म्हणाल्या की, रेल्वेच्या आधुनुकिकरणात आपला सांस्कृतीक वारसा जपून सुशोभिकरण होईल त्यामध्ये प्रवाशी सुविधेला प्रथम प्राधान्य असणार आहे. उदा. त्यांना रस्त्यावरून थेट स्थानकात पोहचणे, पार्किंग असणे, खानपान सुविधा असणे, रूट प्लासा उभारणी, एक्झीकीट्युव्ह लॉज स्टेशन अ‍ॅप्रोच, लॅन्डस्केपिंग मॉडेल टॉयलेट, प्लॅटफार्म सरफेस, केंडल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर, भरपूर प्रकाश योजनेसाठी लाईट, बोर्ड, प्रतिक्षालय, स्थानकांची लांबी व स्टेशन टप वाढवीने, लिफ्ट व एक्सीलेटर जिने वाढवीणे, सौंदरीकरण या शिवाय अपंग, पद्मभूषण व शौर्य पुरस्कारासह अन्य पुरस्कार प्राप्त महनीय व्यक्तींच्या सुविधांचा यात समावेश आहे. भुसावळ विभागातील सर्व विभाग मिळून ‘गतीशक्ती युनिट’ च्या माध्यमातून हा भव्य प्रकल्प साकारला जात आहे. या शिवाय अल्प अनेक सुविधा असून या संदर्भात प्रवाश्यांच्या आणखी काही सुचना असतील तर ट्विटर वर सुचना कराव्यात जेणे करून अधिक चांगले काय करता येईल. असे अवाहन इति पांडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.