14 कोटींचा चरस जप्त; 4 जणांना अटक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मागील आठवड्यात मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली होती. पोलिसांनी एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक करत तिच्याकडून तब्बल 7 किलो हिरोइन जप्त करण्यात केलं होतं. पोलिसांनी जप्त केलेल्या हिरोइनची बाजारातील किंमत तब्बल 21 करोड इतकी होती. संबंधित ड्रग्स तस्करी प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानातील प्रतापगढशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असताना आता जम्मू काश्मीरशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई क्राइम ब्रांचने दहिसर चेक नाक्याजवळ मोठी कारवाई करत 24 किलो चरस जप्त केलं  आहे.

या कारवाईत पोलिसांनी 4 जणांना अटक देखील केली आहे. संबंधित सर्व आरोपी जम्मू काश्मिरमधून ड्रग्स आणून मुंबईत विक्री करत होते. ही टोळी मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात अन्य ठिकाणी देखील ड्रग्स तस्करी करत होते. मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 6 आणि यूनिट 7 ने ही मोठी कारवाई केली आहे.

गेल्या महिनाभरापासून दहिसर चेक नाक्याजवळ सापळा रचून बसल्यानंतर, पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या 24 किलो चरसची बाजारातील किंमत तब्बल 14 कोटी 44 लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे तस्करांनी ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आली होती. सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. क्राइम ब्रांचची टीम गेल्या एक महिन्यापासून दहिसर येथील चेक नाक्यांवर सापळा रचून तस्करांची वाट पाहात होते. अखेर एक महिन्यानंतर, चरस तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.