1 जुलै ते 15 जुलै दरम्यान दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा

0

मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) उर्वरित दहावी (10th) आणि बारावी (12th) परीक्षा जुलैमध्ये घेणार आहे. सीबीएसई 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार आहे. आणि निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होईल. सीबीएसईच्या उर्वरित परीक्षेसाठी विद्यार्थी बरीच प्रतीक्षा करत होते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी लावलेल्या लॉकडाउनमुळे त्याची परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. त्यांनी या परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करीत असलेले विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, परीक्षेचे वेळापत्रक केव्हाही जाहीर केले जाऊ शकते. 5 मे रोजी मंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ज्यात त्यांनी बोर्डाच्या परीक्षा घेतल्यानंतरच स्पर्धा परीक्षा घेण्यात येतील असे म्हटले होते. JEE च्या वेळापत्रकांतर सीबीएसई परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.