श्री रिदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चेरिटेबल ट्रस्टतर्फे मास्क, हातमोजे वाटप

0

भुसावळ : जागतिक महामारी कोव्हिड १९ या विषाणू विरूध्द सर्वस्तरावरुन लढा दिला जात आहे. भुसावळमध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. पोलिस अहोरात्र परिश्रम घेत आहे . पोलिस प्रशासनाने शहरात काहि स्वयंसेवक या कामी नेमले असून ते सुद्धा परिश्रम घेत आहेत.

येथील श्री रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री कल्याणी चेरिटेबल यांच्या संयुक्तविद्यमाने बाजारपेठ , शहर आणि तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी व स्वयंसेवक यांच्या साठी ४५० वाशेबल मास्क आणि चांगल्या गुणवत्तेचे हातमोजे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्याकडे शहर पोलिस ठाण्यात शुक्रवार रोजी रुग्णालयाचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. नितीन पाटील व श्री कल्याणी चेरिटेबल चे संचालक गौतम चोरडिया,  संमकित सुराणा यांनी  सुपूर्द केले. यावेळी आ. संजय सावकारे यावेळी उपस्थित होते. तसेच शहर पोलिस ठाण्याचे पो.नि. ठोंबे व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पो. नि दिलीप भागवत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.