दारू दुकाने बंद ठेवण्याचे मद्रास उच्च न्यायालयाने दिले आदेश !

0

चेन्नई – लॉकडाउनचा कालावधी संपत नाही तोपर्यंत मद्रास उच्च न्यायालयाने राज्यातील सरकारी किरकोळ दारू विक्री केंद्रे बंद करण्याचे आदेश दिले.

दारूच्या दुकानातून होणारी दारू विक्री तसेच खाजगी वाईन शॉपमधून होणारी दारू विक्री थांबवावी अशी मागणी करणारी याचिका तामिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील दारू विक्री थांबविण्यास स्पष्ट नकार दिला. लॉकडाऊन कालावधीत दारू विक्रीसाठी सरकार ऑनलाइन आणि होम डिलिव्हरीचा वापर करू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे.

कोरोना व्हायरसचा धोका थांबविण्यासाठी अंमलात आलेल्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती, पण मार्गदर्शक सूचनांचे संपूर्ण उल्लंघन असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. अधिवक्ता जी राजेश आणि कमल हासन यांच्या पक्षाच्या मक्कल निधी माया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विनीत कोठारी आणि न्यायमूर्ती पुष्पा सत्यनारायण यांच्या खंडपीठाने दारूच्या दुकानांसमोर गर्दी आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याची दखल घेत निर्णय सुनावलं.तसेच रोख पैसे देऊन दारू घेणाऱ्या ग्राहकाला एकावेळी 750 मिलिलिटर दारूची एकच बाटली विकली जावी, असे आदेशही देण्यात आले.

जे कोणी ऑनलाईन ऑर्डर देऊन पेमेंट करून दारू खरेदी करतील त्यांना एका ऐवजी दोन बाटल्या देण्यात याव्यात. ऑनलाईन दारू विक्री झाल्यामुळे दारूच्या दुकानापुढे रांगा लागणार नाहीत आणि सोशल डिस्टनसिंग पाळले जाईल, असे न्यायालयाने सांगितले. तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाले, तर स्वतः मद्रास उच्च न्यायालय दारू विक्री बंद करण्याचे निर्णय घेईल, असेही न्यायालयाने बजावले. सध्या तामिळनाडूमध्ये एकूण 4,829 कोरोनाग्रस्त रुग्ण असून त्यापैकी 3,275 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एकट्या चेन्नई शहरामध्ये 1,975 रुग्ण सापडले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.