मुक्ताईनगर येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

0

प्रतिनिधी । मुक्ताईनगर : कोरोना विषाणू संसर्गजन्य महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जळगांव जिल्ह्याचे पालमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुक्ताईनगर येथे तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक दि 8 मे रोजी दुपारी संपन्न झाली .
बैठकीमध्ये खासदार रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा मतदार संघामध्ये बैठका घेत असतांना प्राथमिक आरोग्य केंद्र , आशा वर्कर यांना अजूनही साहित्याची गरज आहे व बंदोबस्तासाठी होमगार्ड ची व्यवस्था झाली पाहिजे अशी मागणी केली . आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या काळात आरोग्य अधिकारी , कर्मचारी व पोलीस प्रशासन यांचे चांगले सहकार्य मिळत असून अजूनही होम क्वॉरंटाईन चा शिक्का असलेले काही लोकं बाहेर उघड उघड फिरत आहेत सोशल डिस्टनसिंग पाळत नाही तसेच आरोग्य विभागाला पी पी ई किट ची आवश्यकता आहे असे सांगितले .
डॉ निलेश पाटील व डॉ योगेश पाटील यांनी आता पर्यंत कोरोनाच्या संदर्भात 3637 लोकांची तपासणी करून क्वॉरंटाईन केलेले आहे .शहरात तीन कोविड केअर सेंटर मध्ये 600 खाटांची व्यवस्था केलेली आहे . तसेच 200 पी पी ई किट मिळावे अशी
मागणी केली.
रावेर तहसीलदार यांनी कोरोनाच्या काळात विना मास्क असलेल्या 586 जणांवर कारवाई केलेली असून 293000 रु दंड वसूल केलेला आहे .काल रावेर झालेल्या प्रांताधिकारी यांच्या घटनेने अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होता आहे .तसेच कोरोना संदर्भात साहित्याची कमतरता असल्याचे सांगितले. अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना पालकमंत्री यांनी कृषी गटांमार्फत शेतकऱ्यांना बियाणे घरपोच देणार आहोत. यावर्षी बियाण्यांची कमतरता भासणार नाही .येत्या दोन दिवसात होमगार्ड ची संख्या वाढवून दिली जाईल तसेच बाहेर गावी अडकून पडलेल्या मजुरांना आणण्यासाठी शासन 10 हजार बसेस मधून प्रत्येक बस मध्ये 25 आसन व्यवस्था करणार असून यासाठी शासन 20 कोटी रुपये खर्च करणार आहे . रावेर येथे कोरोना संदर्भातील साहित्य खरेदीसाठी 21 लाख रुपये दिलेले आहे .कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थिती मध्ये मास्क न वापरणाऱ्या लोकांवर कारवाई करा गावातील दुकानांचे वेळापत्रक ठरवून घ्या तसेच नाकेबंदी करा .या काळामध्ये नगरपंचायतीने वसुली साठी नागरिकांकडे माणुसकीच्या दृष्टीने तगादा लावू नये . तसेच लॉक डाऊन काळात घरभाडे न घेण्याचा अध्यादेश शासनाने काढलेला असून कर वसुलीतही 100 %वसुलीचा आग्रह न करता 50 % 30 % वसुलीची झाली तर चालेल असे सांगीतले . व मुक्ताईनगर , रावेर व बोडवड अंतर्गत असलेल्या ग्रा पं ती व नगरपंचायतीने गावामध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी विहीर अधिग्रहण , खोलीकरण व पाणीपुरवठ्याच्या रखडलेल्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ पाठविण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना केल्या .व तात्काळ उचंदा परिसरातील सात गावांच्या पाणीपुरवठा योजनेला कृती आराखड्यात घेतल्याचे सांगितले . व 81 गावांची पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल प्रस्तावाला ही तात्काळ मंजूर करीत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत घोषणा केली .

बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रांताधिकारी व मुक्ताईनगर तहसीलदार हे दहा दहा वेळा फोन लावूनही फोन उचलत नसल्याची तक्रार पालमंत्री यांच्याकडे केली यावर पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना तत्पर राहून लोकप्रतिनिधींचा फोन घ्यावा बैठकीत तुम्हाला अपमानास्पद बोलावे असे वाटत नाही अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या .

मुक्ताईनगर येथे रावेर , मुक्ताईनगर व बोदवड तालुक्याच्या आढावा बैठक प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील , खासदार रक्षा खडसे , आमदार चंद्रकांत पाटील , प्रांताधिकारी रामसिंग सुलाने , जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके , मुक्ताईनगर तहसीलदार शाम वाडकर, बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी , रावेर तहसीलदार उशाराणी देवगुणे , नगराध्यक्षा नजमा तडवी , डी वाय एस पी सुरेश जाधव ,नायब तहसीलदार प्रदीप झांबरे , पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे , मुक्ताईनगर मुख्याधिकारी विक्रम जगदाळे , बोदवड मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश पाटील , उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ योगेश राणे यांचेसह मुक्ताईनगर , बोदवड व रावेर तालुक्यातील महसूल , आरोग्य विभाग , कृषी विभाग , नगरपंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.