१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील एका भागातून एका अल्पवयीन मुलीला एका व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते.  १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विजय (पुर्ण नाव माहिती नाही) या तरूणाने अज्ञातपणाचा फायदा घेवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.