पवनदीप राजन बनला इंडियन आयडलच्या 12व्या सीझनचा विजेता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

इंडियन आयडल 12 ची  ट्रॉफी पवनदीप राजनने आपल्या नावावर केली आहे. इंडियन आयडल 12 चा ग्रँड फिनाले 15 ऑगस्ट रोजी झाला. अलका याज्ञिक, उदित नारायण, जावेद अली, मिका सिंग आणि सुखविंदर सिंग यांच्या  सारख्या दिग्गज पाहुण्यांच्या उपस्थिततीत अंतिम 6 स्पर्धकांच्या परफॉरमन्ससह हा भाग 12 तासांचा होता.

पवनदीप राजन, निहाल तोरो, अरुणिता कांजीलाल, षण्मुखप्रिया, सायली कांबळे आणि मोहम्मद दानिश या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी झाली. शेवटी पवनदीप राजनला  इंडियन आयडल 12चा विजेता घोषित करण्यात आले.

शोचा सुत्रसंचालक आदित्य नारायणने फिनालेमध्ये अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत इंडियन आयडॉलच्या 12व्या हंगामाची घोषणा केली. शोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजीलाल, तर तिसऱ्या क्रमांकावर सायली कांबळे राहीली तर मोहम्मद दानिश, निहाल तरो आणि शानमुखप्रिया चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. इंडियन आयडॉलच्या ग्रँड फिनालेला सुखविंदर सिंग, मिका सिंग, अमित मिश्रा, कुमार सानू, जावेद अली, अलका याज्ञिक, उदित नारायण यांसारख्या अनेक संगीत दिग्गजांनी हजेरी लावली.

इंडियन आयडॉलचा 12 वा हंगाम जिंकून पवनदीप राजनने केवळ शोची ट्रॉफी जिंकली नाही तर त्याला 25 लाखांचे बक्षीस देखील देण्यात आले. याशिवाय एक मारुती स्विफ्ट कार देखील पवनदीपला भेट देण्यात आली. पवनदीपचे नाव जाहीर होताच त्याचे आई-वडील आणि शोमध्ये उपस्थित असेलेल्या कुटुंबीयांचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले.

उत्तराखंडमधील चंपावत या सुंदर शहरात 2 जुलै 1996 रोजी पवनदीप राजनचा जन्म झाला. त्याचे वडील  सुरेश राजन यांच्याकडून पवनदीपला संगीताचे शिक्षण मिळाले. पवनदीपचे वडील स्वतः एक सुप्रसिद्ध सामान्य लोकगायक आहेत. त्याची बहीण ज्योतिदीप राजन देखील गायिका आहे. पवनदीपने आपले प्राथमिक शिक्षण युनिव्हर्सिटी सीनियर सेकंडरी स्कूल, चंपावत येथून केले. त्याने नैनीताल येथील कुमाऊँ विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. गाण्याव्यतिरिक्त त्याला गिटार, कीबोर्ड, तबला, पियानो आणि ढोलक सारखे वाद्य वाजवण्याचे देखील ज्ञान आहे. पवनदीपने आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात टीव्हीवरूनच केली. 2015 मध्ये त्याने दूरदर्शनवरील रिअॅलिटी शो ‘द व्हॉइस इंडिया’मध्ये भाग घेतला होता आणि या शोमध्ये तो प्रसिद्ध गायक शानच्या टीममध्ये होता. इंडियन आयडलच्य 12 व्या सीझनमध्ये पवनदीपने अंतिम फेरी गाठली आणि हे सीझन आपल्या नावावर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.