चोपडा येथे अमरधामचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा येथील रामपुरा भागातील स्मशानभूमीचे लोकार्पण नुकतेच 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत व माजी विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडले. नगरपालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पाच कोटी 68 लाख रुपये खर्चून एक आगळी वेगळी स्मशानभूमी चोपडा नगरपालिकेने तयार केली आहे. या ठिकाणी हजारो लोक बसू शकतात. एवढी सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी एकाच वेळी पाच शवांवर अंत्यसंस्कार करण्यात येऊ शकतात एवढी प्रशस्त अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातच काय पण भारतात सुद्धा अशी स्मशानभुमी कुठेही नसेल एवढी देखणी अशी वास्तु नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आली असून माणसाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास सहा सुखकर व सोयीचा व्हावा कोणत्याही प्रकारे हेळसांड होऊ नये, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या स्मशानभूमीचे काम करण्यात आले आहे. स्मशान भूमी एरियात सर्व सुख सुविधा युक्त त्यात पाण्याची मोटर,नळ, फिटिंग, आंघोळीची व्यवस्था, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोघ बाजूला येण्याजाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चोपडा नगरपरिषदेला दीडशे वर्षाची परंपरा असून आपली नगरपरिषद कधीच म्हातारी होत नाही, मी स्वतः सहा वर्षे नगराध्यक्ष होतो, त्यावेळी विरोधकही स्ट्रॉंग होते, पण काम करण्याची प्रवृत्ती असली की, चांगले आशीर्वाद घेता येतात. मृत्यू हा अटळ आहे. तसेच गरिबी सारखा दुसरा गुरु कोणी नाही गरीबी विसरून आत्मविश्वास वाढवा, अंधश्रद्धेने कधीच आत्मविश्वास वाढत नाही, जीवन भाऊ सारखा व्यक्ती नगरपरिषदेला लाभला आणि जीवन भाऊ नगरपरिषदेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. लवकरच चोपडा शहराचा चेहरा मोहरा बदलेल असे उदगार माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही आपले मनोगत मांडले ते असे म्हणाले की, अशीच स्मशानभुमी महाराष्ट्रात कुठेही नसेल, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे व या ठिकाणी सुंदर असे संदेश सुद्धा लिहिले आहेत. सर्वात जास्त जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण चोपडा येथे होते चोपडे शाहराची हानी खूप झालेली आहे. त्यात पावसाने पाठ फिरवली आहे. शासकीय स्तरावर लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल. शेतकरी हवालदिल झाला आहे. असेही अभिजित राऊत हे म्हणाले.

अविनाश गांगोडे मुख्याधिकारी यांनीही आपल्या मनोगतात असे सांगितले की, लवकरच चोपडा शहराचा विकास झपाट्याने होईल एक डिजिटल शहर म्हणून चोपडा शहर ओळखले जाईल. मुख्य चौक नगर परिषद समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पूर्णाकृती पुतळा लवकरच बसवण्यात येईल, घनकचरा डेपो पिकनिक स्पॉट म्हणून विकसित करण्यात येईल, तेथे जाऊन जेवण करता आलं पाहिजे, पिकनिक ला लोक येतील, अशाप्रकारे सुशोभीकरण करण्यात येईल, ड्रीम प्रोजेक्ट राबवला जाईल असे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नगराध्यक्षा मनिषा ताई चौधरी, माजी आमदार दिलीप राव सोनवणे, गोरख तात्या पाटील, एडवोकेट घनशाम पाटील, एडवोकेट संदीप भैय्या पाटील, उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, अजगरली दादा, बांधकाम सभापती रमेश शिंदे, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार अनिल गावित, सुमित शिंदे, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, चंद्रहास भाई गुजराथी, सुनील जैन, आशिष भाई गुजराथी, जितेंद्र देशमुख, महेंद्र धनगर हे उपस्थित होते.

यावेळी आर डी पाटील, कदम नाना पाटील, आणि सचिन गवांदे यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राधेश्याम पाटील सर यांनी केले व आभार प्रदर्शन जीवन चौधरी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.