माथेफिरूने दोन एकर कपाशीचे पीक उपटून फेकले

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या धारागीर गावानजीक एका माथेफिरूने वीस मे ची लागवड असलेले कपाशीचे पीक उपटून कापून फेकून दिले . जवळपास एक ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  याबाबत  एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.

एरंडोल येथील महेश शालिग्राम काबरा यांचे धारागीर गावालगत अकरा एकर शेतात बागायती कपाशीची लागवड करण्यात आली आहे. धारागीर येथील अभिमान सुभान पाटील यांना निम्मे  हिश्याने सदर शेती देण्यात आली आहे. त्यात बागायती कापसाची लागवड करण्यात आली आहे.

सदर कपाशीचे पीक तीन महिन्याची असून झाडांना कैऱ्या सुद्धा लागलेल्या आहेत. असे असताना कोणीतरी माथेफिरूने सुमारे दोन एकरातील कपाशी उपटून व कापून फेकून दिली.  ही घटना १५ ऑगस्ट २१ रोजी रात्री घडली १६ रोजी अभिमन पाटील हे शेतात पीक पाहायला गेले असता सदर प्रकार त्यांना दिसून  आला.

Leave A Reply

Your email address will not be published.