कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट कमी होत  असताना तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता  कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या आता ५० हजारांच्या आत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटचा देशात तुटवडा पडू नये, यासाठी मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्र व्यापार महासंचलनालयानं (डीजीएफटी) याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटला निर्यातबंदीच्या यादीत टाकण्यात आलं आहे. हा निर्णय त्वरित लागू झाला आहे,’ असं डीजीएफटीनं अधिसूचनेत नमूद केले आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास भारताला मोठ्या संख्येने चाचण्या कराव्या लागतील. त्याची तयारी म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच, तर त्या परिस्थितीत देशातच कोरोना टेस्टिंग किट उपलब्ध असावीत या उद्देशाने किटच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.