हैदराबाद पुन्हा बलात्काराने हादरले !

0

हैदराबाद : तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. एका रिक्षा चालकाकडून 18 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. 8 डिसेंबर रोजीच ही घटना घडली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला.या हत्याकांडातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. त्यानंतर झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत आजीच्या घरी जात होती. यावेळी हा प्रकार घ़डला होता. तरुणी रस्ता विसरली असल्याचे आरोपीच्या भावाच्या लक्षात आले. यावेळी रिक्षाचालक असलेल्या आरोपीच्या भावाने त्या दोन्ही मुलींना घेऊन स्वत:च्या घरी नेले. यावेळी त्याच्या आईने मुलींना घरी सोडण्यासाठी लहान भावाला पाठवले. मात्र त्याने मुलींना घरी घेऊन न जाता परिसरातील लॉजवल नेले. दरम्यान लहान मुलगी झोपलेली असतानाच मोठ्या बहिणीवर नराधमाने अत्याचार केले. या सर्व घटनेनंतर तो रेल्वे स्थानकावर दोघींना सोडून तो फरार झाला. नंतर पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना फोन करुन सर्व माहिती दिली. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार अरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

गेल्या महिन्यात दिशा सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणानंतर हैदारबादसह देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यातही घेतलं. तपासासाठी घटनास्थळी आरोपींना नेले असता त्या ठिकाणी झालेल्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले. त्यानंतर या चकमकीवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.